डफळापूर,वार्ताहर : डफळापुर ते अंकले या अनेक दिवसांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी खासदार संजयकाका पाटील व आमदार विलासराव जगताप यांनी चार कोटीचा निधी मिळवून दिला. त्यातून या रस्त्याचे दोन टप्प्यात काम सुरू करण्यात आले आहे.आज दुसऱ्या टप्यातील कामाचे उद्घाटन खा.पाटील,आ.जगताप व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून अंकले ते संकपाळ वस्ती(डफळापुर) येथे पर्यंत काम गतीने सुरू आहे.दुसऱ्या टप्प्यात संकपाळ वस्ती(डफळापुर)ते डफळापुर गावापर्यंतच्या रस्ता कामासाठी 1 कोटी 35 लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे.त्याचेही काम लवकरचं सुरू होत आहे.या रस्त्यामुळे डफळापुर ते अंकले अंतर सुमारे 5 किलोमीटरने कमी झाले आहे.शिवाय डफळापूर परिसरातील संकपाळ वस्ती,पाटील वस्ती,देवदास पाटील वस्ती,माळी वस्ती या परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.जत पश्चिम भागातील महत्वाची गावे असणाऱ्या डफळापुर ते अंकले येथे जाण्यासाठी पूर्वी बेळुंखी,बाज असा 12 किलोमीटरचा फेरा पडायचा.त्यामुळे डफळापुर ते अंकले या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती.या रस्त्यावरील डफळापूरच्या वाड्या-वस्त्याचा पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल होऊन संपर्क तुटत होता. त्यामुळे गावचे युवा नेते परशुराम चव्हाण सर यांनी या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्याला यश आले असून खासदार पाटील व आमदार जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याला शासनाच्या विशेष दुरूस्ती योजनेतून तब्बल चार कोटींचा निधी मिळाला आहे.त्यातून दर्जेदार होत आहे.येत्या दोन महिन्यात हा रस्ता नागरिकांसाठी खुला होणार आहे.यामुळे अंकले – डफळापुर अंतर सात किलोमीटर होईल.त्यामुळे यापरिसरातील नागरिकांचा वेळ व खर्चही वाचणार आहे.त्याशिवाय प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या आरेवाडी बिरोबा या मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना फायदा होणार आहे. रस्ता कामासाठी निधी दिल्याबद्दल खा.पाटील व आमदार जगताप याच्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.