शेगाव दरोड्यातील दरोडेखोर जेरबंद

0
5

सांगली,प्रतिनिधी : सांगलीचे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा व अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यांमध्ये झालेले दरोड्याचे गंभीर गुन्हे उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या व त्याकरता विशेष पथकही तयार करण्यात आले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पथक तयार करून घडलेल्या दरोड्याची माहिती घेतली व सदर दरोडे उघडकीस आणणे त्यांना प्रतिबंध करण्यासाठी माहिती काढून रेकॉर्डवरील आरोपी यांचे हालचालीवर लक्ष ठेवून ठेवून होते. त्यांनी जत, उमदी आणि कागवाड या परिसरात फिरून बातमीदार तयार करून गोपनीय माहिती काढून सांगली जिल्ह्यात झालेल्या घरफोडीतील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना माहिती मिळाली चोरीतील सोने विक्री करण्याकरता सराफ बाजारात दोन आरोपी येणार आहेत. याबाबत सदर पथकाने सापळा लावून त्या दोघांना ताब्यात घेवून सोन्याचे रोख रक्कम व मोबाईल ताब्यात घेतले. यामध्ये मंजुनाथ गुरुनाथ पेडणेकर (व.28 रा. दत्तमंदिर रायबाग, जि. बेळगाव) व शिवाजी उत्तम कांबळे (व.42 रा. अमितमिल शेजारी जि.कोल्हापूर) यावेळी त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल मिळून आले.

याबाबत अधिक तपास करता त्यांनी आमच्या साथीदार यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील कुरळप व जत भागात दरोडे केल्याचे सांगितले. यावरुन त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांचा अजून एक साथीदार आकाश आप्पा चव्हाण (व.20, रा. उमराणी रोड पारधीतांडा जत) हा कर्नाटक राज्यात जाण्यसाठी मिरज एस.टी. बसस्थानकावर फिरत असता पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या वरील तिन्ही आरोपींनी व त्यांच्या साथीदारांनी दि. 21/11/2018 रोजी पहाटे 02.45 च्या सुमारास शेगाव (ता.जत) येथील साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घराच्या समोरील दरवाजावरती दगड घालून दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील लोकांना मारहाण करून, घरातील तिजोरीतील व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेऊन चोरून नेले. यामध्ये 3 लाख रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 90 हजार500 रुपयेचा मुद्देमाल नेला होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here