डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील डफळापूर येथील बहुचर्चित पेयजल पाणी योजनेचे गावात दाखल झालेल्या पाणी पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, अँड.प्रभाकर जाधव,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,संरपच बालिका चव्हाण, पाणीपुरवठा समिती अध्यक्ष बाबासाहेब पाटील,माजी उपसंरपच पमाताई संकपाळ,राजश्री शिंदे,शंकरराव गायकवाड,उपसंरपच प्रतापराव चव्हाण,विलास माने,बि.आर.पाटील,विलास माने,दिगंबर माने,जे के माळी आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते.
योजनेतून प्राथमिक स्वरूपात बसाप्पावाडी तलावातून पाणी योजनेच्या पाईपलाईन मधून डफळापूर आडात सोडण्यात आले आहे. सध्या गावात पाण्याची अडचण असल्याने आडातून प्रादेशिक पानी योजनेच्या टाकीतून पाणी ग्रामस्थांना सोडण्यात आले आहे.श्रीफळ वाढवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणी पुजन करण्यात आले.यावेळी पाणी योजनेसाठी राबलेल्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.
माजी सभापती मन्सूर खतीब म्हणाले,पाणी योजनेत कोणताही भष्ट्राचार झालेला नाही. सर्व तपासण्या,चौकशात ते सिध्द झाले आहे.ग्रामस्थांना पाणी देण्यासाठी आम्ही सर्व अडचणी,आरोप झेलले आहेत. आता पाणी आपल्या दारापर्यत आले आहे.आजचा आंनदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे.
ते म्हणाले,अंकले,बसाप्पावाडीला विरोध तडीस लागूनही योजनेला घरभेदी झाली.आपल्यातील काही जणाकडून विरोध झाल्याने पाणी योजनेला आडकाटी आली होती.मात्र आम्ही सर्व अडचणीवर मात करत योजना पुर्णत्वाकडे आणली आहे.गावातील पाणी वितरण पाईपलाईन टाकताना विरोध केल्याने आता थेट घरापर्यत पाणी देता येत नाही.पंरतू सध्या योजनेचे काम अतिंम टप्यात आहे.पाणी शुंध्दीकरण यंत्रणा,अंतर्गत नळजोडण्या,पाईपलाईन करावयाच्या आहेत.त्याशिवाय वाड्यावस्त्यावर पाणी पोहचविण्यात येणार आहे. योजनेचे दर दहा वर्षापुर्वीचे आहेत,तरीही आम्ही ठेकेदारांना विंनती करून काम करून घेत आहोत.सध्याचे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करत आहेत.यापुढे राजकारण विरहित काम करून गावाला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी आम्ही कठीबंध्द आहेत.दरम्यान पाणी योजनेच्या भरलेल्या पाईपलाईन मधून येत असलेले पाणी पाहून दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या डफळापूराच्या चेहऱ्यावर आंनदोत्सव दिसत होता.हे ग्रामस्थाच्या पूर्णत: हक्काचे पाणी असल्याने ते कायम मिळणार हे निश्चित आहे.युवक नेते परशुराम चव्हाण सर यांनी प्रस्ताविक केले.
स्व.सुनिलबापू आज असायला पाहिजे होते
डफळापूरतील विकास कामात माझे मित्र स्व.सुनिलबापू चव्हाण यांचा मोठा सहभाग असायचा.त्यांनी व आम्ही मिळून डफळापूरचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना आखली होती.त्यांच्या पश्चात या योजनेची स्वप्नपुर्ती झाली आहे. ते आजच्या कार्यक्रमाला असायला हवे होते.असे यावेळी बोलताना मन्सूर खतीब भावूक होत उद्गार काढले.
डफळापूर पेयजल योजनेचे गावात दाखल झालेल्या पाण्याचे पुजन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधि,ग्रामस्थ उपस्थित होते.