जिरग्याळ पाणी योजनेच्या पाईपलाईनचे आज उद्घाटन

0


डफळापूर, वार्ताहर : जिरग्याळ ता.जत गाव भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या पाईपलाईनचे उद्घाटन आज सोमवारी सकाळी दहा वाजता आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते,व जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, सह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संरपच दिपक लंगोटे यांनी दिली.

लंगोटे म्हणाले,जिरग्याळ गावभागाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन कालबाह्य झाली आहे.पंचवीस वर्षापुर्वीच्या पाईपलाईनला सतत गळतीचे प्रकार उद्भवत होते.त्यामुळे ग्रामस्थांना पुरविण्यात अडचणी येत होत्या.नव्याने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे सहा लाख रुपये खर्चून नवी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्या पाईपलाईनला नव्या जोडण्या देऊन ग्रामस्थांना मुबलक व स्वच्छ पाणी यामुळे मिळणार आहे.निवडणूकीआधी दिलेल्या आश्वासनानुसार गावात ग्रामस्थाच्या सोयीसुविधा उपलब्धं करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.त्याचाच भाग म्हणून या पाईपलाईनचे लोकार्पण होत आहे. जिरग्याळ तलावासह,नव्याने बंधारे काढणे,तलाव बंधाऱ्यातील गाळ काढणे गावातील गटारी,अतर्गंत रस्त्याचे मजबूती,म्हैसाळ योजनेचे पाणी गावातील तलावात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.ग्रामस्थाच्या हितासाठी आम्ही सदैव कठिबंध्द आहोत.असेही यावेळी लंगोटे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी स्थानिक पदाधिकारी, व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.