जत यल्लमा यात्रेसाठी प्रतिष्ठान,प्रशासनाचे तगडे नियोजन, 31 डिसेंबर पासून यात्रा सुरू

0
4

जत,(प्रतिनिधी): जत येथील यल्लमा देवीची यात्रा ता.31 डिसेंबर 2018 पासून सुरू होत आहे.यात्रेस प्रशासनाकडून यल्लमा देवी प्रतिष्ठानला सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल असे प्रतिपादन जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. ते श्री.यल्लमा देवी प्रतिष्ठान जत यांच्या वतीने बोलावण्यात आलेल्या नियोजन बैठकीत बोलत होते.

यावेळी तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, सहाय्यक गटविकास अधिकारी आण्णासाहेब नानगुरे, जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे,श्री.यल्लमा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष श्रीमती ज्योत्स्नाराजे अनिलराजे डफळे, अन्नसुरक्षा अधिकारी एस.एस.हाके, पोलीस निरीक्षक अशोक भवड, वनक्षेत्रपाल एम.एच.मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. डी.जी.पवार, प्रा.आ.केंद्र वळसंगचे  एस.पी.डगळे, जत आगार व्यवस्थापक वि. आ. होनराव, दिलीप कोरे,विजमहावितरण सहाय्यक अभियंता व्ही.एम.सुतार, सहाय्यक दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरजचे जे.एच.मुल्ला,बांधकाम विभाग पं .स .जतचे एस.डी.देवकाते, निवासी तहसीलदार जी.एल.शेट्टयापागोळ, नितीन शिंगाडे, तलाठी  रविंद्र घाटगे, आदी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीमंत शारदुलराजे डफळे यांनी जतच्या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातुन लाखो भाविक येतात या भाविकांसाठी प्रशासनाने पाण्याची सोय करावी अशी मागणी केली. यात्रा परिसरातील श्री यल्लमा देवी नळपाणीपुरठा विहीरीला पाणी नसल्याने व विंधन विहीरीही कोरड्या पडल्याने यात्रेत भाविकांना आंघोळीला व पिण्यासाठी पाणी कमी पडणार आहे. यासाठी प्रशासनाने यात्रेकरूसाठी पाण्याची सोय करावी अशी मागणी केली. यावर  प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांच्याकडून जत शहरातील पाणीपुरवठ्याची माहीती घेतली. मुख्याधिकारी म्हणाले, जतला पाणीपुरवठा करणा-या बिरनाळ तलावात 20 एम.सी.एफ.टी.इतका पाणीसाठा असुन तो कमी आहे.यावर ठोंबरे यांनी बिरनाळ तलावात म्हैशाळ योजनेचे पाणी सोडावे व जत शहरातील पाण्याचा व यात्रेचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी लवकरात लवकर प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा,असे आवाहन केले.तसेच महावितरणच्या अधिकारी यांनी मंदिरातील व मंदिर परिसरातील 

विद्युत वायरीचे तपासणी करून अहवाल सादर करावा, असें आदेश दिले.

जत नगरपालिकेने यात्रेत स्वच्छता राखणे व यात्रेकरूंच्यासाठी तात्पुरता शौचालयाची व्यवस्था करावी,अशी सूचना केली. तसेच यात्रेकरूंची वाहने धानेश्र्वरी काॅलनी, जत हायस्कूल, साईप्रकाश मंगल कार्यालय या मार्गावरून परत जाणा-या मार्गावर मुरूम टाकून हा मार्ग दुरूस्त करावा असे आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाला यात्रा मार्गावरील रस्ते दुरूस्त करण्याचे आदेश दिले. यात्रेसाठी येणा-या पोलीस कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था पं.स.च्या बचतभवन हाॅलमध्ये करण्यात येईल त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालावे असे सुचविले. तसेच पं.स.आरोग्य विभागाने यात्रेत पाणी पुरवठा सुरू असताना टि.सी.एल.ची तपासणी करण्यासाठी दोन आरोग्य कर्मचारी यांची नेमणूक करावी असे आदेश दिले.

जत आगाराने जत यात्रेसाठी आगारातील 92 एस.टी.बसेस बरोबरच गुडडापुर यात्रेत जशी स्मार्ट बसेसची सोय केली होती तशीच सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगीतले. पोलीस प्रशासनाने यात्राकाळात चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखावी.सि.सि.टि.व्ही. च्या आधारे गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना केली. यात्रेतील मेवामिठाई व खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अन्नसुरक्षा अधिकारी यांच्याकडून नोंदणी करून घेण्याचे आवाहन अन्नसुरक्षा अधिकारी हाके यानी केले.

जत यल्लमा यात्रेसाठी प्रतिष्ठान,प्रशासनाच्या बैठकीत बोलताना प्रांताधिकारी तुषार ठोंबरे व मान्यवर

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here