गॅस विझले.. पुन्हा पेटल्या चुली जत तालुक्यातील उज्ज्वला,ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गॅस सिंलेडरचे दर

0

Image result for प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

जत,प्रतिनिधी : ‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’ असा नारा देत केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशातील दारिद्र्य रेषेखालील 5 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.जत तालुक्यातही हाजारो गँस सिलींडर दिले आहेत. या योजनेअंर्तगत ग्रामीण भागातील आर्थिक मागास समाज तसेच आदिवासी, कातकरी समाजाच्या महिलांच्या नावे गॅस सिलिंडरचे तसेच शेगडीचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांनी गॅस घेण्यासाठी चांगला प्रतिसादही दिला. मात्र गॅस भरण्यासाठी लागणा-या किंमती या आर्थिक मागास असलेल्या समाजाच्या आवाक्याबाहेर गेल्याने सिलिंडर गॅसपेक्षा आपली चुलच बरी, अशी भावना ग्रामीण भागातील गॅस न परवडणा-या महिला आणि कुटुंबे व्यक्त करत आहेत. पावसाअभावी करपल्याने शेतक-यांच्या हातातले उत्पन्न गेले. या शेतीत मजुरी करणा-या हातांचे कामही गेल्याने शेतमजुरांवरही बेरोजगाराची कु-हाड कोसळली. त्यातच तालुक्यातील अनेक व्यवसाय डबघाईला जात असल्याने तेही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तेथेही हातांचे काम कमी झाले आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गॅस भरण्यासाठी लागणारे हजार रुपये आणायचे कुठून? हा प्रश्न या समाजाला पडला असल्याने पुन्हा लाकडे गोळा करून चुली पेटवण्याचा मार्ग या समाजाने निवडला आहे.महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करतांना लाकडी जळण वापरण्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे भारतात होणारे मृत्यू कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना ब-याच मात्रेत होणा-या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे व इतर कारणांसाठी केंद्र शासनाकडून महिलांना गॅसचे वाटप करण्यात आले. मात्र घरगुती गॅस सिलिंडरचा दर एप्रिलमध्ये 645 रुपये होता. जूनमध्ये तो 691, ऑगस्टमध्ये 778, तर नोव्हेंबरमध्ये 934 रुपयांपर्यंत पोहचला. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतच 289 रुपयांची वाढ झाली आहे. एकत्र कुटुंब असलेल्या मोठ्या घरासाठी महिन्याला दोन सिलिंडर लागतात. त्यांची जास्तच आर्थिक कोंडी होत असून केरोसीन मिळणेही दुरापास्त झाले आहे. गॅसच्या किमती वाढत रहिल्यास घरी आणलेले गॅस हे फक्त शोभेची वस्तू म्हणून घरात राहणार असल्याचे या कुटुंबातील महिलांकडून बोलले जात आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.