जत,प्रतिनिधी: निपानी(कर्नाटक) येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत डॉ.रविंद्र आरळी फाऊंडेशनच्या कराटेपट्टूनी 3 सुवर्ण,6 रौप्य पदके घवघवीत यश संपादन केले.त्यात रोहन तिकोटी,सुदर्शन माळी व रिया तिकोटी यांनी संयुक्तिक सुवर्ण पदक पटकावले.तर भाग्यश्री पाटील,अमृता भंडारे,यश पट्टनशेट्टी,प्रतिक कोळी, अनिरुद्ध शिखरे,मयूर ऐहोळी यांनी रौप्य पदक मिळविले. रवीवारी निपानी येथे राष्ट्रीय नॅशनल लेव्हल कराटे चॅम्पीयन 2018 या स्पर्धा घेण्यात आल्या.संस्थेचे मुख्य प्रशिक्षक विजय तिकोटी यांचे मार्गदर्शन लाभले.परवेज गडीकर व गुरूशांत माळी यांचे सहकार्य मिळाले.