माडग्याळ दरोड्यातील वाहन पळवून नेहण्याचा प्रयत्न, दरोडेखोंरांच्या साथीदारांचे कृत्य : संशियताना दोन दिवसाची पोलीस कस्टडी

0

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथील युवराज बियरबार दरोड्याप्रकरणातील दोन दरोडेखोरांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी जत न्यायालयाने सुनावली.दरोडेखोंरांची  अपघातग्रस्त क्लूझर गाडी दरोडेखोंरांच्या साथीदाराकडून पळविण्याचा प्रयत्न फसला.उमदी,जत पोलीसाकडून दरोडेखोंरांच्या अन्य साथीदारांचा शोधार्थ पथके रवाना केली आहेत.
माडग्याळ उमदी रोडनजिक असणाऱ्या हॉटेल युवराज बियरबार वर सोमवारी मध्यरात्री  सात-आठ दरोडेखोरांनी सशस्ञ दरोडा टाकला. हॉटेलमधील मालक व कामगारांस तलवार,लोंखडी रॉडचा धाक दाखवत जीवेमारण्याची धमकी दिली.हॉटेलमधील रोख रक्कम,दारूच्या बॉटलसह सुमारे पावनेतीन लाखाचा मुद्देमाल दरोडेखोंरांनी पळविला होता.दरोड्यातील मुद्देमाल क्रुझर गाडीतून घेऊन जाताना दरोडेखोंरांच्या मागावर असलेल्या स्थानिंक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना पाठलाग करून मुद्देमाल माल व दोन दरोडेखोरांसह पकडले,अन्य तीन-चार दरोडेखोर पळाले होते.पुढील तपास स्थानिंक गुन्हे शाखेचे पथक उमदी,जत पोलीसाकडून सुरू केला आहे.शेगाव,सह तालुक्यातील अन्य दरोडे,चोऱ्यांचा तपासाच्या दृष्टीने पोलीस प्रयत्न करत आहेत.दरोडेखोंरांना मंगळवारी जत न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. दरम्यान कोळीगिरीनजिक अपघातग्रस्त झालेली क्लूझर गाडी दरोडेखोंरांच्या आठ ते दहा महिला,पुरूष साथीदाराकडून पळवून नेहण्याचा प्रयत्न मात्र काही नागरिकांनी प्रंसगावधान दाखविल्याने त्याचां प्रयत्न फसला.उमदी पोलीसांनी बुधवारी दुपारी ती क्लूझर ओढून आणून माडग्याळ चोकीसमोर लावली.दरम्यान दरोड्यानंतर दरोडेखोंर पकडले असतानाही त्यांच्या साथीदारांचे धाडस पोलीसांची आवाहन देणारे आहे.पकडलेल्या दरोडेखोंरांकडून अन्य साथीदारांचा शोध व  गुन्ह्याची कबूली करून तडा लावण्याचे धाडस उमदी पोलीसांना दाखवावे लागणार आहे.

Rate Card

माडग्याळ दरोड्यातील अपघातग्रस्त क्रुझर गाडी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.