लिंगायत समाजाचे जंतरमंतरवर आंदोलन; धर्माला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी.

0
8

Related image

नवी दिल्ली : लिंगायत समाजाला स्वंतत्र धर्माचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी बुधावारी लिंगायत समाजातर्फे जंतरमंतरवर आंदोलन करण्यात आले. लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याची मागणी जोर धरत आहे. लिंगायत हा एक धर्म असून ती जात नाही असे लिंगायत समाजाचे मत आहे. कोणताही उच्च नीच भेद न मानता समानतेची वागणूक देणारा हा धर्म आहे. त्यामुळे या धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बसवेश्वर यांनी या धर्माची स्थापना केली. त्यांचा काळ 1134 ते 1196 असा होता. त्यामुळे सुमारे हजार वर्षापूर्वीचा हा धर्म आहे. त्याला स्वंतत्र दर्जा देण्याची मागणी लिंगायत समाजाने लावून धरली आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here