जत पंचायत समितीचे अँड. घेरडे उपसभापती
जत,प्रतिनिधी: जत पंचायत समितीच्या उपसभापती अँड. आडव्याप्पा घेरडे यांची बिनविरोध निवड झाली.
जत पंचायत समितीत यापर्वी कॉग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. राष्ट्रवादीचे शिवाजी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
गिरगाव गणातून निवडून आलेले जनसुराज्य पक्षाचे आडव्याप्पा घेरडेे यांनी भाजपला पांठिबा दिला आहे. त्यामुळे त्यांना आ.विलासराव जगताप यांनी उपसभापती पदाची संधी दिली. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी निवडीसाठी विशेष सभा बोलविली होती.त्यात घेरडे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या सभेला कॉग्रेसचे चार सदस्य गैरहजर होते. तर सत्ताधारी पक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते.निवडीनंतर आ.विलासराव जगताप यांनी घेरडे यांचा सत्कार केला.यावेळी डॉ.रविंद्र आरळी, सभापती सुशिला तावशी, आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रविपाटील, माजी सभापती मंगल जमदाडे,शिवाप्पा तावशी,सुनिल पवार,मारूती पवार उपस्थित होते.

जत पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल आडव्याप्पा अँड. घेरडे यांचा सत्कार करताना आ.विलासराव जगताप, डॉ.रविंद्र आरळी व मान्यवर