देशभरात काँग्रेसचा जल्लोष

0
3

नवी दिल्ली:मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत आहेत. पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल असे दिसून येत आहे.  लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणार्‍या या विधानसभा निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.आत्तापर्यंतचा पाच राज्याचा निकाल पाहता काँग्रेस तीन राज्यात आपली सत्ता स्थापन करू शकते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयाचा आनंद देशभरतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

आम्हाला भारत भाजपामुक्त करायचा नाही. आम्ही लोकसभा निवडणुका अत्यंत ताकदीने लढणार आहोत. आम्ही भाजपाशी टक्कर देणार आहोत मात्र आम्हाला देश भाजपामुक्त करायचा नाही असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशासमोर आत्ता सगळ्यात मोठे तीन मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांवर आम्ही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवल्या आणि याच मुद्द्यांवर आम्ही लोकसभा निवडणुकांनाही सामोरे जाणार आहोत.भाजपाने जरी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असली तरीही आम्ही मात्र त्या विचारांचे नाही आम्हाला भाजपमुक्त भारत नको असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here