माडग्याळ,वार्ताहर :माडग्याळ(ता.जत) येथील ग्रामीण रुग्णालयात पाणीटंचाईमुळे रुग्णांना पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले होते.त्यामुळे रुग्णाचे हाल सुरू होते.यांची दखल घेत ग्रामस्थांच्या पुढाकाराने लोकवर्गणी काढून रुग्णालय परिसरात कुपनलिका मारण्यात आली व त्यास सव्वा इंच पाणीसुध्दा लागले आहे.त्यात मोटार टाकून पानी पुरवठा सुरू केला आहे.पाण्याची सोय केल्याबद्दल रुग्णाकडून समाधान व्यत होत आहे.रुग्णालयाचे अधिक्षक एम.डी.गडदे यांनी ग्रामस्थांना पाणीटंचाईबाबत महिती दिली होती.रूग्णाचे बाल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सांगली बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम,पदवीधर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम सावंत,ग्रामपंचायत सदस्या साधना सावंत,ग्रामीण रुग्ण कल्याण समितीचे सदस्य परसुराम बंडगरआदम नदाफ यांनी प्रांरभी प्रत्येकी पाच हजार रुपये वर्गणी काली.त्यातून कमी पडलेले पैसे गावातील लोकांकडून वर्गणी गोळा करून बोर मारण्यात आली.त्यास पाणीसुध्दा चांगले लागले आहे. मोटार बसवून पाणी सुरू केले आहे.त्यामुळे रुग्णांना पाण्याची सोय होत आहे.
माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात लोकवर्गणीतून कुल नलिका खोदून रुग्णांना पाणी पुरवठा सुरू केला आहे.