दुष्काळाने फळबागा मोडीत ! सव्वातीन हजार हेक्टर क्षेत्र धोक्यात: स्त्रोत आटले ; शासनाकडून मदतीची अपेक्षा

0

संख – वार्ताहर : जत तालूक्यातील तीव्र दुष्काळाने पाण्याअभावी फळबागा वाळून जात आहेत. मागील 2014- 15 मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे फळबागांचे झाडे जगविण्यासाठी प्रशासनाकडून आर्थिक़ मदत मिळाली होती.परंतु, यंदा गतवर्षीच्या तुलनेत भयावह दुष्काळ असून, उपलब्ध जलस्त्रोत आटले आहेत.त्यामुळे बागा जगवायच्या कशा, असा प्रश्न असून, त्यासाठी शासनाने हेक्टरी अनुदान देवून बागायतदारांना दिलासा देण्याची गरज आहे.
जत तालुक्यात अत्यल्प पावसाअभावी फळबागा धोक्यात आल्या आहेत. तालुक्यातील  हजारो हेक्टर फळबागा क्षेत्रापैकी मोठय़ा क्षेत्रावरील फळबागा पाण्याअभावी मोडीत काढण्याची वेळ आली आहे.
तालुक्यात अलिकडच्या काळात द्राक्ष, पपई, आंबा, डाळींब ,शेवगा या फळबाग लागवडीकडे शेतकरी वळला आहे. परंतु तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासना केलेल्या फळबागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. यामुळे फळबाग लागवडीसाठी केलेला खर्च यंदाच्या भयावह दुष्काळामुळे वाया जातो की काय अशी परिस्थिती आहे. तालुक्यात डोंगराळ भाग असल्याने शेततळे घेऊन सर्रास ठिबकचा वापर करीत फळबागा जगविला परंतु भयावह दुष्काळामुळे ह्या बागा अडचणीत आल्या आहेत. उपलब्ध असणारे पाणी संपुष्ठात आल्याने बागा जगवायच्या कशा हा प्रश्न फळबाग लागवड शेतकर्‍यांसमोर उभा आहे.
अत्यल्प पावसामुळे यंदा सर्व प्रकल्प ,साठवण तलाव, पाझर तलाव बहुतांश ठिकाणचे कोरडेठाक आहे. काहींनी उपलब्ध पाण्यावर मागील काळात फळबागा जगविल्या. परंतु, दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने फळबागा धोक्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागील 2010 पासून समाधानकारक पाऊस नाही. आतापर्यंत कशातरी बागा अनेकांनी जगविल्या.परंतु यंदा भयावह दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. बागा जळू लागल्या आहेत. त्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे यापूर्वीच केली आहे. अद्याप कसलाच प्रतिसाद नसल्याचे बागायतदार शेकडो एकर द्राक्ष, डाळींब बागा यंदा भयावह दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याअभावी जळून जात आहे. त्यामुळे आर्थिक़ नियोजन पूर्णत:कोलमडून गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.