जत,प्रतिनिधी: घोलेश्वर ,सनमडी,टोणेवाडी,खैराव या गावांना ओढापात्रातून येत्या आठ दिवसात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी पाणीपट्टी वसूली सुरू आहे.त्याला सहकार्य करावे असे आवाहन भाजप नेते सुनिल पवार यांनी केले.तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सनमडी परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्या बाबत खा.संजयकाका पाटील, आ.विलासराव जगताप व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.नैसर्गिक उताराने घोलेश्वरमार्गे सनमडी ,टोणेवाडी, खैराव ओढ्यातून पाणी सोडण्याची तयार दर्शवली आहे.त्याशिवाय तेथून पुढे येळवी तलावात पाणी सोडण़्याचे नियोजन अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सहभागी होते.पाणीपट्टीचे पैसे संबधित विभागाकडे भरावेत असेही पवार यांनी सांगितले.
जत : सनमडी,येळवी परीसरात म्हैसाळचे पाणी सोडावे याबाबतचे निवेदन खा.संजयकाका पाटील यांना दिले.