हक्काचे पाणी सांगोल्याकडे वळविल्याने हा प्रंसग उद्भवला
जत,प्रतिनिधी:मौजे कासलिंगवाडी ता.जत येथील 40 शेतकऱ्यावर प्रशासनाने म्हैशाळ योजनेतील पाणी पळवल्याचा गुन्हा दाखल केला आहेत.पाण्यासाठी गुन्हा दाखल व्हायची ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.त्यांचा आम्ही कॉग्रेसच्या वतीने निषेध करतो.तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्राधान्य द्यावे असे आवाहन तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार बैठकीत केले.
म्हैसाळ योजना ही मुळची मिरज,कवठे महांकाळ,जत तालुक्यासाठी मंजूर असताना खास करून जत तालुक्याला वगळून सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यातील गावांना पाणी सोडण्याचे षंडयंत्र सध्याचे शासन करत आहे.जत तालुक्यातील योजनेत समाविष्ठ असणाऱ्या गावांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जात नाही.तालुक्याच्या वाटणीचेही पाणी सांगोला तालुक्यातील गावांना पाणी सोडणे कितपत योग्य आहे.या ऐवजी टेंभू योजनेचे पाणी सांगोला तालुक्यात सोडता येते,पण शासन जाणूनबुजून जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.या बाबत सत्ताधारी भाजपचे आमदार व पदाधिकारी मुग गिळून का गप्प आहेत.पाणी आमच्या हक्काचे असताना शेजारील तालुक्यातील गावांना पाणी सोडले जाते व ते आडवले म्हणून गुन्हे दाखल केले जातात.ही निंदनीय बाब आहे.
म्हैसाळ योजनेतून वंचित असणाऱ्या गावांना पाणी देतो,अशी खोटी आश्वासने देत सध्या भाजपचे काही पदाधिकारी फिरत आहेत.तसेच जि.प.व प.सं. निवडणुकीवेळी कर्नाटकातून पाणी आणण्याचे कॉंग्रेस गाजर दाखवत आहे असे म्हणणाऱ्यांनी सध्या जत तालुक्यातील सिमेवर कर्नाटकात आलेले पाणी बघून फोटो सेशन करून जनतेची दिशाभूल केली आहे.येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे भाजपवाले नाटक करत आहेत.पण तालुक्यतील सुज्ञ जनता यांच्या भूलथापाना बळी पडणार नाही.
हेच प्रयत्न गेल्या 4 वर्षात विधानसभेत कर्नाटक व महाराष्ट्र सयुंक्त करार करून सीमाभागातील गावांना द्या असा प्रश्न मांडला असता व पाठपुरावा केला असता तर आज पूर्व भागातील 42 गावांना तुब्ची-बबलेश्वर योजनेचे पाणी मिळाले असते.
या तुरची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळण्यासाठी विक्रमदादांनी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील मंञ्याची सयुंक्त पाणी परिषद घेवून प्रथम संकल्पना मांडली होती.तेथून त्या योजनेला गती आली आहे.हे जतच्या जनतेला चांगले माहित आहे.त्यामुळे कुणीही घोडे दामटवयाचा प्रयत्न करून नये असेही शेवटी बिराजदार म्हणाले.