योजनेच्या ठिकाणी फोटो काढण्यापेक्षा योजना पुर्ण होण्यासाठी प्रयत्न करा : सांवत

0
2

जत,प्रतिनिधी: जत पुर्व भागातील महत्वाच्या तुबची-बोबलेश्वर या आंतराज्यीय योजनेतून 42 गावांना पाणी आणावे यासाठी आम्ही गेल्या दहा वर्षापासून लढा उभारला आहे.त्यासाठी दहा वर्षात चार पाणी परिषदा घेऊन सतत त्यांचा पाठपुरावा करत आहोत.त्यामुळे योजना अतिंम टप्यात आहे.आता  योजनेचे श्रेय लाटण्याचा हास्यास्पद प्रयत्न आमदारांचे बगलबच्चे करत आहेत.असा आरोप कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी पत्रकार बैठकीत केला.
सांवत पुढे म्हणाले,तालुक्यात पाणी क्रांती आणणारी ही योजना पुर्ण व्हावी म्हणून आम्ही गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मुख्यमंत्री,पाटबंधारे खात्याचे मंत्री तसेच अधिकाऱ्यांना भेटून योजना यशस्वी करण्यासाठी धडपडत असताना विद्यमान आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योजनेला खोडा  घालण्याचा प्रयत्न केला.मात्र आम्ही जनरेटा कायम ठेवल्याने आज ही योजना यशस्वी होण्याच्या मार्गावर अाली आहे.उशीराने शहानपण सुचलेल्या विरोधी मंडळीना ही योजना आम्ही करत असल्याचा साक्षात्कर झाला आहे. त्यामुळे ते श्रेय लाटण्याचा खटाटोप करत आहेत. जनतेला सर्व माहित असल्याने ते त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील.
सांवत म्हणाले, ही योजना कोणी आणि आणि कोणामुळे यशस्वी होत आहे हे सर्व जतची जनता जाणते. त्यामुळे योजनेच्या ठिकाणी जाऊन फोटो काढण्यापेक्षा शासन दरबारी जाऊन योजना पूर्ण करणेसाठी प्रयत्न केला तर बरं होईल!असाही टोला सांवत यांनी हाणला.यावेळी तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदर,उपाध्यक्ष कुंडलिक दूधाळ,महादेव अंकलगी,माज़ी सभापती बाबासाहेब कोडग,माज़ी पं.स.सदस्य पिराप्पा माळी, माज़ी सदस्य,मलेश कत्ती,जि.प.सदस्य महादेव पाटील,पं स.सदस्य रवि सावंत,दिग्विजय चव्हाण,आप्पा मासाळ, नाथा पाटील,मार्केट कमिटी संचालक संतोष पाटील, रामगोंडा संत्ती,अभिजीत चव्हाण दयगोंडा बिराजदर,माज़ी नगरसेवक सुजय शिंदे, मोहन  कुलकर्णी,माज़ी नगरसेवक महादेव कोळी,भूपेंद्र कांबळे,नगरसेवक पंटु गवंडी,श्रीकांत शिंदे, माज़ी नगराध्यक्ष रवि साळे,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम,उपाध्यक्ष राजेंद्र माने,नगरसेवक निलेश बामणे,नामदेव काळे,आपु माळी, सायबराव कोळी,मुन्ना पखाली,जत तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विकास माने,जिल्हा सरचिटणीस रमेश कोळेकर फिरोज नदाफ,ईराणा निडोनी,गणी मुल्ला,सलीम पच्छापूरे,योगेश व्हनमाने आदि उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here