तुबची-बोबलेश्वर योजनेतून सिंचनापासून वंचित गावांना पाणी देणार : प्रकाश जमदाडे

0

जत,प्रतिनिधी: सततच्या दुष्काळाने होरफळत असलेल्या व सिंचन योजनेपासून वचिंत जत तालुक्यातील पूर्व भागातील गावांना कर्नाटक राज्यातील जत सीमेलगत असणारी तुबची-बबलेश्वरच्या कवटगी कॅनालमधून नैसर्गिक उताराने पाणी देणे शक्य आहे.त्याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचे माहिती मार्केट कमिटी सांगलीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिली.तालुक्यातील सीमेलगत तुबची बबलेश्वर कवटगी कॅनालमध्ये पाणी आल्याचे समजताच श्री.जमदाडे,शिवाप्पा तावंशी,मोटेवाडीचे सरपंच,पोलिस पाटील,ग्रामस्थांनी पाहणी केली.सीमेलगतच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. योजनेच्या कर्नाटकतील तिकोटा पासून पुढील कॅनालची पाहणी केली.कँनॉलचे शिरटेवस्ती व बागलकोट वस्ती पर्यंतचे काम पूर्ण आहे.समुद्रहट्टी तलावातून थेट मोटेवाडी ता.जत येथील तलावात पाणी सायफन पध्दतीने सोडणे शक्य आहे.या तलावाखाली पाच गावच्या पाणी पुरवठा योजना आहेत.त्याचबरोबर बेळोडगी,हळ्ळी,बालगाव,मोटेवाडी,भिवर्गी,करजगी,धुळकरवाडी,सोनलगी यासह 22 गावात पाणी नैसर्गिक पध्दतीने जाऊ शकते.कमी खर्चात दोन्ही राज्याच्या समन्वायाने कमी वेळात कमी खर्चात पाणी देणे शक्य आहे.सध्या कवटगी कॅनालमधून सोडलेले समुद्रहट्टी तलावातील जादा झालेले पाणी जत हद्दीत आले आहे. ही योजना अगदी कमी वेळात व कमी खर्चात सुरू होणार आहे. याकरिता आंतरराज्य पाणी करार करणे गरजेचे आहे.महाराष्ट्र सरकार दरवर्षी कर्नाटकास पाणी देते.त्याबदलात जतला पाणी द्यावे.एक टीएमसी पाणी जतला देण्यात यावे अशी मागणी आमदार विलासराव जगताप यांनी विधानसभेत केली आहे.दरम्यान पाणी टंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. शेतीसह,चारा,पाणी टंचाईतून येथील शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी यासाठी योजनेचे पाणी लवकरात ललकर सोडावे याकरिता पाठपुरावा करणार असल्याचेही जमदाडे यांनी सांगितले.खासदार संजयकाका पाटील,आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.लवकरचं खासदार संजय पाटील पूर्व भागात व कर्नाटक भागातील कवटगी कॅनालची पाहणी करून दोन्ही राज्यातील शेतकरी,अधिकारी,लोकप्रतिनीधीशी चर्चा करणार असल्याचेही जमदाडे यांनी सांगितले.

कर्नाटकातील तुरची बबलेश्वर कवटगी कॅनालची पाहणी करताना माजी सभापती प्रकाश जमदाडे  व शिवाप्पा तांवशी आदी

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.