कोळगिरीत शेतकऱ्यांची आत्महत्या

0
2

जत,प्रतिनिधी : कोळगीरी (ता.जत) येथील शिवाजी सिद्धाप्पा पुजारी (वय 50) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजी यांचा मुलगा सिद्धाप्पा शिवाजी पुजारी यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, शिवाजी सिद्धाप्पा पुजारे गावालगत असलेल्या भैरवनाथ देवाचे पुजारी आहेत. मंदिराची सुमारे 52 एकर जमीन आहे. देवाची पूजा करून ते शेतजमीन कसत होते. बुधवारी दुपारी मंदिर परिसरात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना घरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर गावकामगार पोलीस पाटील सचिन बिराजदार यांना त्यांची माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना कळविले आहे. शिवाजी पुजारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय माने करत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here