कुडणूर खूनप्रकरणी संशयितास अटक,जत पोलीसांची कारवाई : कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर मुसक्या आवळल्या

0
3

जत,प्रतिनिधी: कुडणूर ता.जत येथील सिध्दनाथ बाबासो सरगर याच्या खून प्रकरणातील संशियत प्रमोद तानाजी खांडेकर याच्या अखेर पोलीसांनी मुसक्या आवळल्या. त्यांने खूनाची कबूली दिल्याचे पोलीस निरिक्षक अशोक भंवड यांनी सांगितले.
सिध्दनाथ व प्रमोद यांच्यातील किरकोळ वादातून बुधवार, ता.9 रोजी सांयकाळी 7 वाजता धारदार शस्ञाने हल्ला करून खून केला होता.लक्ष्मीपुजनाच्या दिवशी झालेल्या खूनाच्या घडनेने कुडणूरसह परिसरात खळबंळ उडाली होती.घटनेदिवशी संशयिताने पलायन केले होते.जत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने अरोपीचा शोध घेत होते. संशियताचा ट्रकचा व्यवसाय असल्याने सोलापूरहून हैद्राबाद असा पोलीसांना चकवा देत फिरत होता.सोमवारी तो हैद्राबाद येथून सोलापूर मार्गे मुंबई येथे जाणार असल्याची खबर पोलीसांना लागली होती.

हेही वाचा: वाहतूक पोलीसाची दंबगिरी,पोलिसाच्या समोरच वाहने पार्किंग;वरकमाईसाठी कायमपण,पोलीस बनलेत चर्चेचा विषय

दरम्यान प्रमोद कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळाली त्या आधारे पोलीसांनी सापळा लावला. संशियत स्टेशनवर येताच त्याला पकडण्यात आले. मारहाणीच्या वादातून सिध्दनाथचा खून केल्याची कबूली त्याने पोलीसांना दिली आहे.पोलीस अधिक्षक सुहैल शर्मा,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर,पोलीस निरिक्षक अशोक भंवड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सा.पो.नि.रणजित गुंडरे यांच्यासह पोलीस नाईक उमर फकीर,कॉन्टेबल संदीप नलवडे,यांच्या पथकाने ही कामगिरी केली.अधिक तपास गुंडरे करत आहेत.व्यवसायाने ट्रक्टर चालक असलेल्या सिध्दनाथ यांचा जून्या वैरत्वातून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील प्रमोद हा संशयित टेम्पोचालक आहे. 

हेही वाचा: सुभेदार बाळासो सोनलकर अंनतात विलिन, हिवरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सहा महिन्यापुर्वी त्यांच्यात हाणामारीपर्यत वाद झाला होता. बुधवारीही सायंकाळी त्यांच्यात भांडण झाले होते. सिध्दनाथ दुचाकीवरून सरगर येथील घरी जात असताना प्रमोदने टेम्पोतून त्यांचा पाठलाग केला.खांडेकर वस्तीनजिक त्याने टेम्पो अडवा उभा केला.टेम्पोतून उतरून  सिध्दनाथच्या डोक्यात गाडीतील शस्त्राचा जोरदार प्रहार केला. त्यात सिध्दनाथची डोक्याची कवटी फुटल्याने तो जागीच ठार झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here