जत | अन्यथा सांगोल्या पाणी देणार नाही,आमदार विलासराव जगताप यांचा इशारा |
जत,प्रतिनिधी :म्हैसाळ योजनेतील जत तालुक्याच्या वाट्याचे पूर्ण क्षमतेने दिल्याशिवाय सांगोला तालुक्यास पाण्याचा थेंबही देणार नाही,असा इशारा आमदार विलासराव जगताप यांनी दिला.
म्हैसाळ योजनेची आढावा बैठक आमदार जगताप यांनी घेतली. यावेळी जि पचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगाैडा रविपाटील,कार्यकारी अभियंता विजय पाटील,सभापती सुनंदा तावशी,जि प सदस्य सरदार पाटिल, पं.स.सदस्य रामन्ना जीवान्नवर,श्रीदेवी जावीर,प्रभाकर जाधव,सुनिल पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा: जत | टंचाईचा मुकाबला करण्यास प्रशासन सज्ज : प्रांताधिकारी तुषार ठोंबरे |

आमदार जगताप म्हणाले,म्हैसाळ योजनेच्या पाणीवाटपात जतवर नेहमीच अन्याय केला जात आहे.जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे भरूनही पाणी दिले जात नाही. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी जतच्या वाट्याचे पाणी पळवितात.म्हैसाळचे एक अधिकारी त्याला पाठबंळ देत आहेत. त्या अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी,अशी मागणी त्यांनी केली.
सध्या तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असल्याने म्हैसाळ योजना हा एकमात्र पर्याय आहे. योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत,अशी सुचना केली. अपूर्ण कामांचा आढावा घेतला.लोकांची ग्राहणी ऐकून उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली.