शेगाव: जत तालुक्यातील शेगाव येथे अज्ञात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे.स्टॅडनजिकच्या शुक्रवारी दोन पानपट्ट्या, मोबाईल शॉपी,धनश्री मल्टी- स्टेट सोसायटीच्या शटरची कुलपे तोडून चोरीचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला.तर शिवकुमार शिंदे यांच्या इलेक्ट्रिकल दुकानातील रोख दोन हजार रुपयांची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान ही घटना रात्री दोनच्या सुमाराला घडली असून धनश्री सोसायटीच्या ऑफिसचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यात एका चोरट्यांचे छायाचित्र रेकार्ड झाले आहे.शेगाव येथील वारंवार होणाऱ्या चोऱ्यांनी व्यापारी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी चोऱ्यांच्या घटना घडतात मात्र अद्यापही पोलिसांना चोरटे पकडण्यात यश आले नाही.शेगाव येथील पोलीस चौकी कायम बंद असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे.वर्षातून तीन वेळाच येथील पोलिस चौकी उघडते. तीही 15 ऑगस्ट,26 जानेवारी,1 मे या दिवशीच उघडी असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून त्यामुळे चोरांना भीती राहिली नाही.पोलीस चौकी कायम सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.
सीसीटीव्ही रेकार्ड झालेला चोरटा