जतला अधिकाऱ्यांची भुमी बनवू : गणेश टेंगले

0

माडग्याळ,वार्ताहर : खडतर परिश्रम करण्याची उर्मी,व स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळवून देतच.फक्त त्यांसाठी आपण तयार असणे गरजेचे आहे.जतच्या दुष्काळी भागात अधिकाऱ्यांची भुमी बनविण्यासाठी मी यापुढे मार्गदर्शक म्हणून काम करेन,
असे प्रतिपादन तालुक्यातील दुसरे आयएएस अधिकारी झालेले गणेश टेंगले यांनी केले.
त्यांचा माडग्याळ येथे भव्य सत्कार करण्यात आला.यशवंत सेनेचे संस्थापक विवेक कोकरे,युवा नेते सचिन मदने,पंचायत समिती सदस्य चव्हाण, संरपच इराण्णा जत्ती,उपसंरपच आंबाण्णा माळी,जत कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल निकम,हिरगोंड सर,प्रविण पाटील,सिध्देश्वर माळी,सदाशिव माळी,चनबसू चौगुले,सुरेश हाक्के,गुरूदास माळी,परसू बंडगर,शिवानंद हाक्के,व्हनाप्पा माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युवक नेते कामाण्णा बंडगर,तिंरगा गणेश मंडळाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा भेट दिली.
टेंगले पुढे म्हणाले,या जगात शिक्षण महत्वाचे आहे.शिक्षण असेलतर अनेक गोष्ठी साध्य करता येतात.मी कुलालवाडी सारख्या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकून अधिकारी झालो.ग्रामीण भागातील मुंलाच्यात सर्व गुण असतात.त्यांना वाव देणारे शिक्षण पध्दती निर्माण होणे गरजेचे आहे.परिस्थिती नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा माणसिकता बदला.या तालुक्यातील यापुढे अधिकारी होऊ इच्छित तरूणांना मी मार्गदर्शन करणार आहे.

Rate Card

माडग्याळ : आयएएस अधिकारी गणेश टेंगले यांचा सत्कर करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.