काराजनगी येथे एकाचा भाजून मुत्यू

0
4

जत,प्रतिनिधी:काराजनगी (ता. जत) येथील संजय हरिदास पवार (वय 40) यांचा भाजून मृत्‍यू झाला आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजता काराजनगी येथील राहत्या घरी संजय भाजून जखमी झाले होते. त्‍यानंतर त्यांना उपचारासाठी जत हून सांगली येथे जात असताना रस्त्यातच मयत झाले.संजय नेमके कशाने भाजले याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही.

याबाबत जत पोलिसांत संजय यांचा भाऊ विजय हरिदास पवार यांनी दिली. त्‍यानुसार जत पोलिस ठाण्यात याबात नोंद झाली असून, अधिक तपास हवालदार संजय माने हे करित आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here