जतच्या भूमीला गौरवशाली इतिहासाची पंरपरा : स्वामी अमृतानंद;”वैभवशाली जत”ग्रंथाचे प्रकाशन
जत,प्रतिनिधी: जतच्या अनेक साधू, संत, देवता व महान विभूतींनी जन्म घेतला असून तालुक्याचा इतिहास वैभवशाली जत या ग्रंथातून मांडण्यात आला आहे,असे प्रतिपादन प पू अमृतानंद स्वामी यांनी केले.
वैभवशाली जत या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा गुरूवारी येथील श्री साईप्रकाश मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ग्रंथाचे प्रकाशन बालगाव आश्रमाचे प.पू.श्री. अमृतानंद स्वामी व श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री विलासराव जगताप हे होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री. सुरेशराव शिंदे सरकार, जि.प.चे माजी उपाध्यक्ष श्री. बसवराज पाटील, माजी आमदार श्री. उमाजीराव सनमडीकर, भा.ज.प.जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. रविंद्र आरळी, अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर जाधव, जि.प.सदस्या सौ. स्नेहलता जाधव, जत पं.स.सभापती सौ. सुशिला तावशी, उपसभापती श्री. शिवाजीराव शिंदे, जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष श्री. आप्पा पवार, बांधकाम सभापती श्री.भूपेंद्र कांबळे, नगरसेवक श्री. स्वप्निल शिंदे,नाना शिंदे, नीलेश बामणे, इकबाल गवंडी, पं.स.माजी सभापती मन्सूर खतीब, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, दै.पुढारी सांगली चे उपसंपादक श्री.गणपत (आबा) पवार, जि.प.सदस्य सरदार पाटील, पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण, श्रीदेवी जावीर,नगरसेवक श्री. स्वप्निल शिंदे, नाना शिंदे, नीलेश बामणे, सौ. वनिता साळे,बाजार समिती संचालक श्री. अभिजीत चव्हाण, आर. पी.आय. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय कांबळे, चळवळीचे नेते अशोक बन्नेनवर, रा.स.प.नेते अजितकुमार पाटील, सरपंच परिषद अध्यक्ष बसवराज पाटील, लायन्स क्लब अध्यक्ष दिनकर पतंगे,काॅन्ट्रक्टर असोसिएशन अध्यक्ष सलीम गवंडी, लेखक मच्छिंद्र ऐनापूरे,सुवर्णाताई अलगूर तसेच या ग्रंथाचे प्रकाशक श्री. तानाजीराजे जाधव, आदि मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. दिनराज वाघमारे यांनी केले. सुत्रसंचालन श्री. राजेंद्र मानेसर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. मोहन माने-पाटील, पत्रकार जयवंत आदाटे, किरण जाधव, भागवत काटकर,संजय गुरव, नाना गडदे, विश्वनाथ तळसंगी, मनोहर पवार, परशुराम भोकरे, मच्छिंद्र ऐनापूरे, मच्छिंद्र बाबर, बसवराज अलगूर महाराज यांचे सहकार्य लाभले. आभार कार्यक्रमाचे संयोजक श्रीकृष्ण पाटील यांनी केले. आदी मान्यवर उपस्थित होते.
“वैभवशाली जत”ग्रंथाचे प्रकाशन करताना अमृतानंद स्वामीजी,आ.विलासराव जगताप,राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,भाजपचे नेते डॉ.रवीद्र आरळी आदी मान्यवर

Attachments area