नगरपालिकेत अनागोंदी,मनमानी कारभार ; विजय ताड, साडेपंधरा कोटीचा निधी पडून, विकास खुंटला

0
1

जत,प्रतिनिधी: जत शहरातील कचऱ्यांसाठी 11 लाख 68 हाजार खर्चूनही शहरात घाणीचे सामाज्र वाढले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पालिकेत सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.पालिकेत काय चालू अाहे यांची माहिती नगरसेवकांना दिली जात नाही. विकास शुन्य आहे.अशा कारभारामुळे शहराला गालबोट लागत आहे.पालिकेत 15 कोटी 68 लाखाचा निधी पडून आहे.यात आम्ही कामे सुचवूनही सत्ताधाऱ्यांनी अंधारात ठेवत निधी वापरला नाही.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार बैठकीत केली.
ताड म्हणाले,आमचे नेते खा.संजयकाका पाटील, आ.विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातून पालिकेला दोन कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.त्यातूनही कामे केली जात नाहीत.शहरात गेल्या दहा दिवसापासून कचरा हटविलेला नाही.गेल्या महिन्यात कचरा उठाव बंद आहे.त्याच पाचगणीच्या ठेकेदाराला मुदत वाढ देऊनही स्थिती अशी आहे.तीन लाखाच्या टेंडरला पालिकेचे सत्ताधारी 11 लाख 68 हाजार प्रतिमहिना ठेकेदाराला देतात.तरीही कचरा जैसे-थेच आहे.त्यामुळे नेमका पैसा कुणासाठी खर्च होतोय.हा संशोधनचा विषय आहे.
पालिकेला वाली नाही.पालिकेत जूने सदस्यच कारभार चालवित आहेत.नोंदी,एनओशी साठी लक्ष्मीदर्शन महत्वाचे मानले जात आहे. नोंदीत अनियमिता होत आहे. पालिकेच्या सत्ता स्थापन झाल्यापासून 9 बैठका झाल्या. सुमारे 50 ठराव झाले,मात्र त्यांप्रमाणे एकही काम झालेले नाही.दाखवायचे एक करायचे दुसरे असा प्रकार सुरू आहे. विरोधक विकास कामे अडवित आहेत.म्हणून बोब मारून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. तक्रारीचे निवेदन दिल्यानंतर पालिकेेने स्वच्छतेसाठी विशेष सभा बोलविली.सत्ताधारी मंडळीना बोगसगिरी करून दिशाभूल करत पैसे काढण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचा आरोप ताड यांना केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here