माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सर्रास ग्रामस्थाना 50 रुपये बँरेल असे पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याने व पाणी योजनेच्या विहिरीचे पाणी स्ञोत अखेरीला आल्याने पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. गावातील बौंध्द वस्तीमध्ये पाण्यासाठी मरणयातना सहन कराव्या लागत आहे.या वस्तीसाठी एकही कुपनलिका, अथवा बोअरवेल्स नाही.त्यामुळे येथील नागरिकांनी दररोज पाणी विकत घेण्या शिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथील नागरिक वैचागले आहेत. जगण्याची कसरत करत असताना पिण्यासाठी पाणीही विकत घेण्याचे दुरभाग्य आमच्या नशीबी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आल्याचे संतप्त भावना या परिसरीतील नागरिंकानी व्यक्त केल्या.ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात व आम्हाला पाणी द्यावे अशी मागणी या परिसरीतील नागरिंकानी केली आहे.