जत, प्रतिनिधी:जतमधील महिलेने आपल्या 3 चिमुरड्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी रात्री घडली आहे. घरगुती वादातून राधिका सुभाष कोळी या विवाहित महिलेने आपल्या मुलांसह विहिरीत उडी मारली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील यल्लम्मा विहिरीत महिलेने बालकांसह आत्महत्या केली. राधिका सुभाष कोळी (वय 30) या महिलेने आपली 3 मुले प्रज्वल सुभाष कोळी (वय-3 वर्ष), आराध्या सुभाष कोळी (वय-2 वर्ष) आणि 4 महिन्यांचा मुलगा हर्षल सुभाष कोळी अशी मृतांची नावे आहेत.पतीसोबत घरगुती वाद झाल्याने मध्यरात्रीच्या सुमारास राधिकाने हे कृत्य केले. आज सकाळी घरच्यांनी या सर्वांची शोधाशोध सुरु केली. तेव्हा विहिरीत उडी मारल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.