जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील निगडी बु. येथे नवरात्रोत्सव निमित्त बसविलेल्या दुर्गादेवीच्या शेवटच्या दिवशीच्या महाप्रसाद खाल्याने शंभरावर भाविकांना विषबाधा झाली आहे.उमदी, उटगी,माडग्याळ, जत शहरातील खाजगी दवाखान्यात विषबाधीत भाविक उपचार घेत आहेत.या प्रकाराने खळबंळ उडाली आहे.
निगडी बु. येथे आज दसऱ्यानिमित्त शिरा,बात असे महाप्रसादाचे आयोजन केले होते.तेथील अनेक भाविकांनी महाप्रसाद घेतला होता.त्यांना काही वेळानंतर एका पाटोपाट एक अशा सुमारे दीडशे भाविकांना पोटदुखी,उलट्या,संडास लागल्याने त्यांना जिकडे शक्य आहे. अशा दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.निगडी येथे जत आरोग्य विभागाची टीम पोहचली आहे.तेथे प्राथमिक उपचार करून रुग्णांना पुढील उपचार्थ हलविले जात आहे. रुग्णवाहिका,संख,माडग्याळ,उमदी येथे आरोग्य कर्मचारी तपासणी करत आहेत. नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे समजू शकले नाही.सध्या उमदी 15,उटगी 13,माडग्याळ 9 इतके रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाची प्रकृत्ती स्थिर असल्याचे व सर्व विष बाधित रुग्णांवर उपचार सुरू केले असस्याचे तालुका वैधकीय अधिकारी डॉ. डी.जी.पवार यांनी सांगितले.