संख,वार्ताहर: संखच्या पंचायत समितीच्या सदस्या कविता खोत यांना सभापती पद देऊन दुष्काळी संख परिसराला न्याय द्यावा अशी मागणी विविध संघटनानी भाजप पक्षाकडे केली आहे.
जत तालुक्यातील कायम दुष्काळाशी दोन हात करणारा संख परिसरीत यंदा उच्चशिक्षित सदस्या निवडून आल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी प्रस्तापित सत्ताधारी गटाला बाजूला ठेवत भाजपला मोठी साथ दिली आहे.त्याशिवाय संखमधील ग्रामपंचायत, सोसायटीत भाजपप्रणीत पँनेल विजयी झाले आहे.जनता भाजपच्या बाजूला असून भविष्यात खासदार,आमदार निवडणूकीत त्यांची भाजपला साथ राहणार आहे.त्यामुळे या गणाच्या सदस्या सौ.खोत यांना सभापती पदाची संधी द्यावी.सौ.खोत उच्चशिक्षित,अनुभवी व प्रशासनातील माहिती असणाऱ्या महिला आहेत.त्यांच्या शिक्षणाचा जतच्या विकासात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या पंचायत समिती प्रशासनाला होईल.त्याशिवाय संखला न्याय मिळेल.संख जि.प.गटातील स्वाभिमानी शेतकरी संघटना,जय भवानी तरुण मंडळ, बाल्मिकी संघटना,गोधळेवाडी, संख,आंसगी,तिल्याळ,दरिबडची, परिसरीतील नागरिंकानी खोत यांना सभापती करण्याची मागणी केली आहे.





