माडग्याळला पुन्हा साथीच्या आजाराने वेढले

0
6

माडग्याळ,वार्ताहर: माडग्याळ ता.जत येथे पुन्हा साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. गावातील तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जत तालुक्यातील मोठे गाव असलेल्या माडग्याळ करांना पाणी टंचाईचा मोठा ताण सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर आता चिकनगुनिया, डेंग्यू,मलेरिया आजाराने वेढले आहे.गावात मोठ्या संख्येने साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे.
गावात पसरलेली दुर्गंधी,कचरा व गटारीत आडलेल्या सांडपाणी यांमुळे डांसाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यांचे परिणाम साथीच्या आजाराच झाले आहे.अंगणवाडी शेजारील गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे अंगणवाडीतील लहानग्यांचे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामपंचायतीच्या उदाशीन भुमिकेमुळे साथीच्या आजार वाढत आहेत. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून तातडीने स्वच्छता मोहिम राबवून औषध फवारणी करावी अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here