लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
माडग्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील व्हसपेठ येथील तांबे वस्तीवर लांडग्याने मध्यरात्री मेढ्याच्या कळपात धुमाकूळ घालत मेंढीवर हल्ला करुन दहा मेंढ्या फस्त केल्या.त्यामुळे तांबे वस्तीवर घबराट निर्माण झाली आहे. लांडग्यांच्या हल्ल्यात दहा मेढ्यांचा मुत्यू झाला आहे.या घटनेत शेतकऱ्यांचे एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले.
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की,व्हसपेठ येथील तांबेवस्तीवरील बिराप्पा पांडुरंग तांबे हे मेंढ्याचा व्यवसाय करतात. घरासमोर मेंढ्या बांधतात. बुधवारी मध्यरात्री चार ते पाच लांडग्याच्या कळपाने अचानक हल्ला केला. कुटुंबातील सर्व लोक घरात झोपले होते.त्यामुळे रात्री आलेल्या लांडग्याची चाहूल लागली नाही.मेंढ्याच्या आवाजाने तांब कुंटुबीयांतील सर्व लोक बाहेर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.तांबे कुंटूबियातील सदस्यानी आरडाओरडा केल्याने शेजारील वस्तीवरील ग्रामस्थ मदतीला आले.सर्वांनी लांडग्यांना पळवून लावले.तोपर्यत मात्र लांडग्यांनी दहा मेढ्यांचा जीव घेतला.दरम्यान गावकामगार तलाठी व वनरक्षक हुग्गे यांनी घटना स्थळी पंचनामा केला. यामध्ये एक लाख वीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.शासनाकडून तांबे कुंटूबियांना मदतीसाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.