जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सिमावर्ती सर्वच गावात अवैध गांजा या अमली पदार्थाच्या विक्री करणारे रँकेट पुर्ण पोलिसा ठाणे हद्दी विकुरले आहे.त्यांची व्याप्ती आता पश्चिम भागापर्यत झाली आहे. या तस्करीत आंतरराज्यीय टोळ्या कार्यरत असल्याची चर्चा आहे. गांजा या अंमली पदार्थाची आहेत. सिमावर्ती उमदी,संख,तिंकोडी,कोंतेबोबलाद परिसरात अनेक ठिकाणी यांचे पिक घेतले जात असल्याची चर्चा असून त्यांची विक्री व वाहतूक ही नित्यांने सुरू असल्याचे कळते.तर नुकतीच पश्चिम भागातील खलाटी येथे गांजा शेती पकडल्याने पुर्व भागातील गांज्या लागवडीचे लोण पश्चिम भागापर्यत पोहचल्याचे समोर आले आहे.
याच गांजामुळे तरूण पिठी बरबाद होत असून अनेक गावातील आडोशाला अनेक तरूण अशा गांजा हुजत बरबादीकडे जात असल्याने आई वडीलाची हताश झाले आहेत. कारण ज्यांनी याला पायबंध घालणे गरजेचे आहे. तेच या प्रकारणा पाठिशी घालत आहे. त्यामुळे या विरोधात बोलूनही उपयोग होत नसल्याचे काही पालकांनी सांगितले. यावर विशेष पथकाने झाडाझडती घ्यावी अशी मागणी होत आहे.
Home Uncategorized गांज्या विक्रीचे लोण तालुकाभर,अनेक गावातील तरूण पिठी आहारी : सततच्या कारवायानंतरही सापडतोय...