जत,प्रतिनिधी:जत शहरातील विभागीय कृषी कार्यालयालगतच्या कृषी विभागाच्या शेतीत जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या जलसंधारणच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले आहे.शासनाच्या योजनेतून जलसंवर्धनाचा अविष्कार येथे पाह्याला मिळत आहे.
गत अनेक वर्षापासून वापराविना पडून आलेली कृषी विभागाची ही जमिनीचे भाग्य खुलले आहे.जतचे सुपुत्र असलेले विभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांनी पुढाकार घेत स्व:ता समोर उभे राहत या क्षारयुक्त जमिनीची स्वच्छता,दुरूस्ती केली आहे.जलयुक्त शिवार योजनेतून नालाबांध,खोलीकरण,बांधबंधिस्त,
जत शहरातील कृषी विभागाच्या कृषी प्रक्षेत्रावर बुधवारी झालेल्या पावसाने पाणी अडविण्यात यश मिळाले आहे.