बनाळी,वार्ताहर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेल्या दुध बंद आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही जत तालुक्यातील अनेक गावात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, दुध दरवाढीशिवाय माघार नसल्याची भुमिका खा.शेट्टी यांनी घेतल्याने तालुक्यातील एक लाख लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले आहे. शेगाव,वळसंग, माडग्याळ, संख,डफळापूर सह अनेक दुध रस्त्यावर ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला. काही गावात शाळेतील मुंलाना दुधाचे वाटप करण्यात आले. जत एमआयडीसी,व तालुक्यातील दुध चिलिंग सेंटर पुर्णत: बंद आहेत.गावागावातील संकलन केंद्रेला तीन दिवसापासून कुलूप लागले आहे.शासन दर देण्यास विरोध करत असल्याने भडका वाढण्याची शक्यता वाढली आहे. तर मोठ्या प्रमाणात दुध संकलन बंद पडल्याने शिल्लक दुधाचे काय करायचे असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. निषेध म्हणून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा जत तालुक्यातील कायम आहे.
जत तालुक्यातील शेगाव, डफळापूर येथे दुध रस्त्यावर ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.