शिंगणापूर | श्री मल्हार हायस्कूल मध्ये विद्या अंलकार संस्थेच्या वतीने वह्या व बॅगाचे वाटप |

0
3

जत,प्रतिनिधी :शिंगणापूर ता.जत येथील श्री मल्हार हायस्कूल येथे गरिब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या व बँगाचे वाटप करण्यात आले.निवृत्त गोदी कामगार तुकाराम पांढरे यांच्या विद्या अंलकार एक घरकूल सामाजिक,शैक्षणिक संस्था मुंबईच्या वतीने या वह्या व बँगा देण्यात आल्या.

संस्थेचे चेअरमन राम पाटील यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. दहावीतील प्रथम यशस्वी पाच विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आले.सोसायटी चेअरमन भानुदास सोनलकर, शिवाजी नाईक, मुख्याध्यापक ए.ए.शिंदे,तानाजी पांढरे, बाबू कांबळे, दादा नाईक,वृक्षमित्र पिंटू पडोळकर,बाळकृष्ण कोंडिगिरे,धनाजी हाजारे,अनिल पाटील व शाळेतील सर्व शिक्षक,व कर्मचारी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here