वळसंग | दूध संकलन केंद्रे कुलूपबंद,दुध बंद आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही पांठिबा |

0

प्राथमिक शाळेत दुधाचे वाटप

वळसंग, वार्ताहर:
शेतीला जोड धंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा पूरक व्यवसाय म्हणून पाहिलं जातं आहे. पण अचानक प्रामुख्याने जर्सीच्या आणि इतर गायी म्हशींच्या दूध दरात घसरण झाल्याने या व्यवसायाला चपराक बसली आहे. दूध संघाच्या अवेळी वेतनश्रेणी मूळे दुग्धव्यवसाय अगोदर पासून टांगत्या तलवारीवर चालू आहे. त्यात दर घसरण झाल्याने व्यवसायाचे भविष्य मात्र धूसर झाले आहे.
रविवारी मध्यरात्री पासून राज्यभरात दुधाच्या दर वाढीचे पडसाद उमटले. वळसंग मधील अनेक दूध संकलन केंद्रांनी सुद्धा दूध न स्वीकारून व शेतकऱ्यांनी दूध केंद्रावर न घालून बंदला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. वळसंग मधील दूध संकलन केंद्राचे सुहास कुलकर्णी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, माझ्याकडे 104 शेतकरी आहेत जे दूध माझ्या केंद्रावर घालतात. संकलित केलेलं दूध आम्ही एकूण अनुक्रमे हटसन-1300 आणि वारणा-200 आणि गोकुळ-100 आणि देशमुख-200 असे एकूण 1800 लिटर दुध आम्ही संकलन करतो.रविवारी पासून दरवाढीसाठी दुध बंद आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी शेतकरी आणि आम्ही तिसऱ्या दिवशी कडकडीत संकलन बंद करून निषेध व्यक्त करतो आहोत. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे आणि राज्यव्यापी आंदोलनात आम्ही सहभागी आहोत. आणि सदर दूध आम्ही गेले 3 दिवस शाळेत वाटप केले.यावेळी दुध उत्पादक उमेश बडगर,संतोष चव्हाण,तानाजी चव्हाण, सुनिल कुलकर्णी,
अनिल चव्हाण, शिवाजी चव्हाण, विनायक माने,सुरेश शिदे, श्रीमत मुचडी, श्रीकात शिंदे, महादेव बडगर,संतोष पाटील, अनिल पाटील, लहू पाटील आदी उपस्थित होते.

Rate Card

वळसंग : दुध बंद आंदोलनाला पांठिबा देण्यासाठी वळसंग ता.जत येथील दुध संकलन केंद्रे कुलूपबंद आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.