डफळापुर |16 गोठे लाभार्थ्यांना कुशलची बिले मिळणार |

0
9

डफळापूर, वार्ताहर: येथील रोजगार हमी योजनेतील बांधलेल्या 16 गोठे लाभार्थांचे कुशल मधील 7 लाखाचा निधी डफळापूर ग्रामपंचायती कडे खास बाब म्हणून वळती करण्यात आला आहे. त्या लाभार्थांना ग्रामपंचायती कडून निधी दिला जाणार असल्याची माहिती ग्रामसेवक एस.एस.कोरे यांनी दिली.
जत पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेतून गाईचे गोठे, सह अनेक कामात भष्ट्राचार झाल्याने निधी दिला नव्हता.नियमानुसार काम केलेल्या लाभार्थांना कुशलचे बिले द्यावित अशी मागणी होती.शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे तहसीलदार, बिडिओ यांनी खास बाब म्हणून तालुक्यातील डफळापूरला सात लाख रुपयाचा 16 लाभार्थांचा निधी वर्ग केला आहे.कामांची तपासणी झालेल्या 16 लाभार्थांना 23 ते 56 हाजारपर्यतचे कुशलची बिले दिली जाणार आहेत.वरिष्ठाचे मार्गदर्शन घेऊन संबधित लाभार्थांना येत्या दोन दिवसात या निधीचे वाटप करणार असल्याचे ग्रामसेवक कोरे यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here