संख | बलात्कार, खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मागणीसाठी ; आज संख बंदची हाक |

0
5

संख,वार्ताहर : येथील एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज संख बंदची हाक देण्यात आली आहे.तसे निवेदन त्यांनी संबधित यंत्रणेला दिले आहे.

संख येथे घडलेली घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे.अगदी क्रुर पणे बलात्कार खून करण्यात आला आहे. अशा घटनेमुळे देशात मुली,महिलाच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे अशा घटनेतील आरोपीना फासीच देणेच योग्य आहे.त्यामुळे संख प्रकरणातील आरोपीवर तातडीने खटला चालवूना त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आरपीआयच्या वतीने हे अंदोलन पुकारले आहे.संख आठवडा बाजरा यामुळे रद्द करण्यात आला आहे.आरपीआयच्या वतीने दुपारी बारा वाजता संख स्टँडपासून अप्पर तहसील कार्यालयावर शांततेने मोर्चा काढण्यात येणार आहे. तेथे कारवाईचे पत्र तहसीलदार यांना देण्यात येणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here