संख | बलात्कार, खून प्रकरण : तिसऱ्या दिवशीही थांगपत्ता नाही |

0
16

संख, वार्ताहर: संख ता.जत येथील तरूणीवर बलात्कार करून खून केल्याचा प्रकार उघडीस येऊन तीन दिवसाचा कालावधी उलटला तरीही अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.त्यामुळे तिसऱ्यादिवशीही गुढ कायम आहे.निश्चित धागेदोरे हाती लागत नसल्याने तपास यंत्रणांनी वेगळी पध्दत अवलंबण्यात सुरू केली आहे. पहिले तीन व नंतर काही संशियतांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. त्यांची स्वंतत्र चौकशी करण्यात येत आहे.संख येथे एका तरूणीवर बलात्कार करून तिचा निर्दयपणे खून केल्याचा प्रकार सोमवारी उघडीस आला आहे. तिचा मृतदेह ऊसातच टाकून सशयिंतानी पलायन केले आहे. शेतीतील वस्तीत कोणी नसल्याने पाळत ठेवून नराधमांनी डाव साधला.मृतदेह आढळून आल्यापासून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनीही गुरूवारी घटनास्थंळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. अतिरिक्त पोलिस अधिक्षक  शशिंकात बोराटे,डिवायएसपी निंबाळकर, हे वरिष्ठ अधिकारी संख मध्ये तिसऱ्यां दिवशीही तळ ठोकून आहेत.घटनास्थंळ,संशियताकडे कसून चौकशी करण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,व स्थानिक पोलिसाची पथके प्रमुख संशियत आरोपीचा शोध घेत आहेत.पुणे,कराड,सातारा,सोलापुर, सांगली,सिमावर्ती भागात तपास सुरू आहे.मात्र नेमके आरोपी शोधण्यात पोलिसांना थांगपत्ता लागला नाही.दरम्यान तपास अतिंम टप्यात आहे.लवकरचं आरोपींना पकडले जाईल असे तपास अधिकारी पोलीस निरिक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान तिसऱ्या दिवशीही पोलिसांना या प्रकरणाचा उलघडा न झाल्याने गुढ कायम आहे. अन्य काही सशयिंताना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कसून चौकशी करण्यात येत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here