जत | सावकाराने जमीन हडपल्याने कोसारीतील शेतकऱ्याची आत्महत्या |

0
11

जत,प्रतिनिधी:
कोसारी ता.जत येथील मनोज उर्फ माणिक बाबूराव संकपाळ (वय-40)या शेतमजूराने झाडास गळपास लावून आत्महत्या केली. पाच वर्षापुर्वी सावकाराकडे गहाण ठेवलेली जमीन हडप केल्याने माणिक यांनी आत्महत्या केली असा आरोप नातेवाईकांनी केला. जत पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी,मनोज उर्फ माणिक संकपाळ यांची एक एकर जमीन आहे.  त्यावर गावातील एका खाजगी सावकाराकडून पाच वर्षापुर्वी एक लाख रुपये कर्ज काढून जमिन खरेदी दिली होती.मनोज यांनी सावकाराला व्याजासह दोन लाख रुपये परत दिले आहेत. सावकारांने संकपाळ यांच्या जमिनीवर कर्ज काढले होते. ते परतफेड करून बोजा उतरवतो व जमिन परत देतो असे संकपाळ यांना सावकारांने सांगितले. मात्र गेली दोन वर्षे जमिन परत दिली नव्हती.
सोमवारी याबाबत तडजोडीची बैठक झाली, त्यात ही जमिन फिरवून द्यावी, अशी मनोज यांनी मागणी केली. मात्र सावकारांने जमिन परत देण्यास नकार दिला.त्याचे मानसिक दडपण मनोज संकपाळ यांने घेतलेे. त्यातून सोमवारी सकाळी चारच्या सुमारास घरासमोरील झाडास त्याने गळपास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नीं तीन मुले,एक मुलगा असा परिवार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here