संख,वार्ताहर : अनाधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतुक राखण्यासाठी नेमलेल्या संख अप्पर तहसिल कार्यालयाच्या पथकाच्या धडक मोहिमेअतर्गंत जालिहाळ खुर्द येथे सोमवारी सकाळी आठच्या सुमारास बेकायदा वाळू तस्करी करत असलेला ट्रँक्टर जप्त केला.
वाळलेली वाळू तस्करी रोकण्यासाठी संख अप्पर तहसिल कार्यालयाच्या पथकाने छापामारी कायम ठेवली आहे. सोमवारी दत्तात्रय शिवाजी सुर्यवंशी यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा टँक्ट्रर अनाधिकृत वाळू तस्करी करत असताना पकडला.ट्रॅक्टरला दीड लाख रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नागेश गायकवाड,एपीआय कुंभार,सिध्दनाथ,पांढरेवाडीचे कोतवाल,पोलिस पाटलांनी कारवाई केली.





