जत | शहरात ताप सदृष्य आजाराचे 58 रुग्ण,1902 घरात तपासणी |

0

 शहरात स्वच्छता कार्यक्रम ; साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनात गती

Rate Card

जत,प्रतिनिधी– शहरातील 26 सार्वजनिक ठिकाणे व 239 घरात डासआळीचे स्थाने तपासणी समोर आली आहेत. विविध तापाचे 58 रुग्ण आढळल्याने शहरात खळबंळ माजली अाहे. विविध भागातील तब्बल तेहतीस जणांना डेंगीच्या तापाची लागण झाली आहे.प्रत्यक्षात 14 चिकणगुण्या,6 डेंगूचे संशियत रुग्ण असल्याचे तालुका वैधकीय अधिकरी डॉ.डी.जी.पवार यांनी विविध वॉटस्अप ग्रुप माहिती टाकली आहे. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.काहीच्यांवर सुरू आहेत.सर्वाची प्रकृत्ती चांगली आहे.शहरातील सर्व भागात सर्व्हे करण्यात आला आहे. प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या असून सर्व साथीचे आजार आटोक्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तरीही शहरा ताप सदृष्य आजाराचे शेकडो रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहेत.
शहरातील गेल्या दोन महिन्यापासून चिकनगुण्या, डेंगूचे अनेक रुग्ण आढळले आहेत
शहरातील अस्वच्छता,तुंबलेल्या गटारीमुळे डांसाचे थव्वेच्या थव्वे नागरिकांना फोडून काढत आहेत.अपवाद वगळता शहरातील सर्व भागात तापाचे रुग्ण आहेत.अनेकांंची प्रकृत्ती खालावली आहे.काही उपचार घेऊन बरे होत आहेत. साथ रोगाची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नगरपालिकेच्या साथीने शहरात धुर फवारणी, पावडर टाकण्यात येत आहेत. शहरातील सर्व भागाचा सर्व्हे करून डांसाची आश्रस्थाने नष्ठ करण्यात येत आहेत.
या सर्व प्रक्रियेची आकडेवारी आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे जरी साथीचे आजार आटोक्यात आले असले तरीही नागरिंकात भितीचे वातावरण पसरले आहे.आरोग्य विभागाच्या माहिती नुसार शहरात 37501 लोकसंख्येची 6152 घरे आहेत.त्यांपैकी 26 जून ते 4 जुलै पर्यत 1903 घराची तपासणी केली आहे,त्यात 33 रुग्ण तापाचे आढळले आहेत. त्यांचे रक्त नमुणे घेण्यात आले आहेत. तर 14. जण चिकनगुण्या,6 जणांना डेंगीसदृष्य तापाची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यातिल 5 जणाचे रक्त,जलचे नमुणे प्रयोग शाळेत पाठविले आहेत. तपासणीत शहरातील  26 सार्वजनिक ठिकाणे व 239 घरात डास अळीचे 
दुषित पाणी आढळलेले आहे.ते स्वच्छ करण्यात आले आहे.4337कंटेनर तपासण्यात आले आहेत. शहरात 26 ठिकाणे डास अळीचे स्थाने आढळली आहेत.अशा 14 ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत.
22 ठिकाणी तुंबलेली गटारी आढळले आहेत. 12 ठिकाणी गटारे वाहती आहेत.
25 जून 4 जुलैमध्ये राबविलेल्या मोहिमेत 4500 घरात धुर फवारणी करण्यात आली आहे. जागृत्तीसाठी हॅडबिले छापून वाटण्यात आल्याचेही आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.

शहरात तापाचे रुग्ण वाढल्याने संपुर्ण शहरातील घराची तपासणी मोहिम राबविण्यात आली आहे. काही सार्वजनिक ठिकाणे,घरात डासआळी क्षेत्र आढळली आहेत. तेथे धुर फवारणी, औषधे,गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. सध्या डासांची उत्पती स्थाने नष्ठ केली जात आहेत. नागरिकांनी घाबरू नये,ताप किंवा अन्य आजार वाढल्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयांत उपचार घ्यावेत.
डॉ.डी.जी.पवार,तालुका वैधकीय अधिकरी 

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.