जत | लावलेले वृक्ष मान टाकू लागले चार इंचाच्या खड्डय़ात वृक्षारोपण : उद्देशाला हरताल : लाखोचा निधी फस्त |

0
5

जत,(का. प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने गेल्या 1 जुलै रोजी 13 कोटी वृक्ष लावण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. 1 ते 7 जुलैपर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्यासाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त करून दिला. परंतु काही ठिकाणी या महत्त्वकांक्षी कार्यक्रमात मोठय़ा प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे चित्र आहे. गंभीर बाब ही की, वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात चक्क टिचभर रोपे लावण्यात आली आहेत. पाऊस नसल्याने हे वृक्ष माना टाकू लागले आहेत.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पुढाकार घेऊन 13 कोटी वृक्ष लागवडीचा हा निर्णय घेतला. या कामात महसूल विभागापासून, तर वनविभागापर्यंत सर्व विभागांना सूचना देऊन वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम गंभीरतेने राबवावा, असा आदेश आहेत. त्यानुसार शासकीय, निमशासकीय विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्या कर्मचार्‍यांना सूचना देऊन हा शासकीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे.मात्र टीचभर माती बाजूला करून लावलेले वृक्ष माना टाकत आहेत. लावल्यापासून पाऊस न झाल्याने लावलेले वृक्ष अखेरची घटका मोजत आहेत.कोट्यावधीचा निधी उडविला जात असताना,वृक्ष संगोपन तर सोडाच वृक्ष लावतानाही साधा निसर्ग नियमही पाळला जात नसल्याचे समोर येत आहे.वाळलेल्या जमिनीत गतीने वृक्ष लावण्याची मोहिम सुरू आहे. वृक्ष भोवतीची ओली माती वाळून वृक्ष माना टाकत आहेत. त्याशिवाय वृक्ष गावागावत कुठेतरी एका ठिकाणी टाकण्यात आले आहेत.ते कुठे लावायचे यांचेही नियोजन नाही.वृक्ष सप्ताहातच जत तालुक्यातील वृक्षारोपणाचा कार्यक्रम फेल ठरत आहे.वृक्ष जत तालुक्यातील वन विभाग,सामाजिक वनीकरणसह काही शासकीय विभागाकडून सुसाट वृक्ष लागवड सुरू आहे. वाळलेल्या मातीत टार्गेट पुर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्चून वृक्ष लागवडीचा देखावा केला जात आहे. लागवडीच्या या कार्यक्रमात मोठा गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. काही ठिकाणी तर झाडे लावण्याचा केवळ देखावाच करण्यात आला. वृक्षारोपणासाठी जे खड्डे खोदावे लागतात, ते खड्डे ईतभरही खोदण्यात आले नाही. काही ठिकाणी त्या खड्डय़ात टिचभर झाडे लावण्यात आले. शासकीय निधीचा अनेक ठिकाणी दुरूपयोग होत आहे. अनेक ठिकाणी शासनातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करताना जे खड्डे खोदण्यात आले, ते चार इंचसुद्धा खोल नाहीत.अर्धा ते पाऊण फूट रूंदीचे हे खड्डे असून या खड्डय़ात वृक्षारोपण केलेच कसे, हा संशोधनाचा विषय आहे. अनेक ठिकाणी तर खड्डे केलेच नाही. फक्त रस्त्याच्या बाजुची माती उकरली असून तेथे वृक्ष लावण्यात आले आहे. त्या ठिकाणचा हा एक केवळ नमूना असून अशा प्रकारे अनेक ठिकाणी शासकीय वृक्षारोपण करण्यात आले आहे. याची गंभीर प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वृक्ष प्रेमीनी केली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी हा प्रकार घडला आहे. वृक्षारोपणासाठी केवळ खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र त्यात वृक्षारोपणच झाले नाही. नियमानुसार खड्डेदेखील खोदण्यात आले नाही. शासनाचा आदेश पाळण्यासाठी केवळ फार्स करण्यात आल्याचे अनेक

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here