जत | तालुक्यातील वृक्ष लागवडीचे ऑडीट होणार |
जत,प्रतिनिधी: केवळ वृक्षलागवड करून चालणार नाही तर ती झाडे जगणेही आवश्यक आहे. त्यामुळेच राज्य शासन विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षलागवडीचे आॅडीटही करणार असून त्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी एकलग्न ता.धरणगाव येथे दिली.
राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यंदा विक्रमी 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत जतला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ नुकताच आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.तेव्हापासून तुफान वृक्ष लागवड सुरू आहे.त्यातील किती जगतील यां प्रश्नचं उत्तर निरूत्तरीत आहे.गतवर्षी लावलेल्या वृक्ष लागवडी पैंकी फक्त तीस टक्के वृक्ष जगले आहेत.वन विभागाच्या कार्यालया लगत लावलेली गतवेळीचे वृक्षही मुळासकट वाळलले आहेत.त्यामुळे जत वनविभाग याबाबत गंभीर दिसत नसल्याचे आरोप होत आहेत.
यंदा वृक्ष लागवडीची संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. यंदा वृक्ष लावगडीसाठी नुसतेच खड्डे करायचे, नावाला झाड लावायचे, फोटो छापून आले की दुर्लक्ष. पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यात झाड लावायचे, हे आता चालणार नाही. याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. किती झाडे लावली? त्यातील किती जगली? किती जळाली? याची माहिती घेतली जाणार असून संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याची पूर्ण काळजी घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन-दोन फुटांवर खड्डे करून काम टाळू नका असेही वनमंञ्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही जतचा वन विभाग,सामाजिक वनीकरणसह विविध विभाग सतर्क दिसत नसल्याचे चित्र आहे.
