जत,(प्रतिनिधी):पर्यावरण संतुलन ठेवायचे असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जत येथील लायन्स क्लबचे संस्थापक व स्त्री रोग तज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांनी जत येथे केले.जत येथील लायन्स क्लब व धनलक्ष्मी पतसंस्थेच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जत येथील उमा नर्सिंग कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले. याप्रसंगी डॉ.आरळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक ए.एम. यशवंत होते. डॉ. आरळी पुढे म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात आम्ही वृक्षारोपण करीतच आलो आहोत. लायन्स क्लबच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत वृक्षारोपण केले आहे. नुसते वृक्ष लागवड करून चालणार नाही, त्याचे संगोपनही केले पाहिजे. याप्रसंगी लायन्स क्लबचे प्रभू जालवादी, शांतीलाल ओसवाल, शिवानंद मोगली, डॉ. विद्याधर किट्टद, राजेंद्र आरळी, महादेव बिराजदार, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, संचालक विजय नाईक, विश्वेश जोशी, सचिव गिरीष कुलकर्णी,पतसंस्थेचे कर्मचारी, पिग्मी एजंट आदी उपस्थित होते.





