येळवी,वार्ताहर:बसर्गी ता.जत येथील निरक्षर व अज्ञान सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची दिशाभूल करत सध्या कार्यरत असणारे ग्रामसेवक भास्कर जाधव यांनी बोगस कामे करत भष्ट्राचार केला आहे.अनेक कामात अनियता,दर्जाहीनता झाली आहे. त्यामुळे जाधव यांच्या कारभाराची चौकशी करून तात्काळ निलंबन करावे अशी मागणी उपसंरपच किशोर बामणे व ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,13 व 14 वा वित्तआयोग मध्ये बोगस कामे कामे करून लाखो रुपायांचा भ्रष्टाचार.,सोलर लाईट,फॉगिंग मशीन न घेता खर्ची टाकलेले आहेत,14 वित्त आयोगातून रस्ता व गटार काम न करता लाखो रुपये भ्रष्टाचार केला आहे,झालेले काम दर्जाहीन, निकृष्ट आहे.,दलित वस्ती सुधार योजनेत चर्मकार समाजाचे समाज मंदिर ग्रामसेवकाच्या आडमुठेपणा मुळे रखडलेले आहे व काम न करता पैसे परस्पर काढून घेतले आहेत. सण 2011-12 ला ठेकेदार श्रीमंत पारसे यांनी दलित सुधार योजनेचे काम केले असून त्यांची अनामत रक्कम 35,4017/- रुपये परस्परं काढून घेतली आहे.प्रधानमंत्री घरकुल आवास व रमाई घरकुल योजनेत,लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे.शौच्छालय योजनेत भ्रष्टाचार तसेच मंजूर असलेल्या घरकुलचे बिल काढून न देता सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत.,ग्रामपंचायत इमारत नूतनीकरण मध्ये गैरव्यवहार करून स्वतः बिले काढून घेतली आहेत.
ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्थ,सरपंच,उपसरंच व सदस्य ह्यांना अंधारात ठेवून कारभार करत आहे.ग्रामपंचायतल वीजबिल न भरल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये वीज नाही व पाणीपुरवठा मोटार आणि बोअर चे वीज कनेकशन बंध झालेले आहे त्यामुळे नागरिकांना गावाबाहेरून जीव धोक्यात घालून विहीर – तलावातून पाणी आणावे लागत आहे.,मागास वर्गीयचा 15 % निधी त्यात्या वर्षात न खर्च करता परस्पर हाडप केला गेला आहे . त्यामुळे दलित वस्तीमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.ग्रामसेवक सण 2013 पासून कार्यरत असून त्यांची कामे संशास्पद असल्याने 2013 पासून ते आजअखेर पर्यंतचे स्पेशल ऑडिट व्हावे अशी मागणी निवेदनात शेवटी केली आहे.
जत : बसरगीतील वादग्रस्त ग्रामसेवक भास्कर जाधव यांच्या गैरव्यवहार ची चौकशी करण्याचे सीईओ ना निवेदन देताना उपसरपंच किशोर बामणे





