जत | वायफळ हल्ला प्रकरण : दुसरा गुन्हा दाखल |

0

जत,प्रतिनिधी : वायफळ ता.जत येथे जुन्या भांडणाच्या रागातून बुधवारी तुंबळ हाणामारी झाली होती.त्यात दोन्ही गटाचे सात-आठ जण जखमी झाले आहेत. बुधवारी एका गटाकडून पाच जणाविराधोंत फिर्याद दाखल झाली होती.गुरूवार पहाटे दुसऱ्या गटाकडून बबन शिवाजी इनामदार यांनी चौदा जणांनी तलवार,सुरे,दगडांनी मारहाण करून स्व:ताला, सुरज इनामदार, सुशांत पाटील,अमर यादव अशा चौघांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातिल सुरज इनामदार यांची प्रकृत्ती चिंताजनक असे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मिरज येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
फिर्यादीवरून किरण यादव,बापूसो यादव,रावसो यादव,दत्तात्रय यादव,सागर यादव,दादासो यादव,मायक्का यादव,कमल यादव,कविता यादव,एकनाथ सुर्यवंशी,ज्ञानेश्वर सुर्यवंशी, समाधान चव्हाण, आण्णासाहेब चव्हाण, कैलास यादव,यांच्या विरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रावसो यादव,विलास यादव,दत्तात्रय यादव,दादासो यादव,कमल यादव,संगिता यादव,यांना अटक करण्यात आली आहे.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.