संख,उमदीत वाळू साठ्यावर छापा,10 ब्रॉस वाळू जप्त

0
11

संख,वार्ताहर : उमदी नजिक भोरनदीपात्रातील लक्ष्मी मंदिर येथे 4 ब्रॉस व  संख मध्यम प्रकल्पातील वाळू तस्करी करण्यासाठी साठा केलेली 6 ब्रॉस  अशा 10 ब्रॉस वाळू साठ्यावर संख अप्पर कार्यालयाच्या पथकाने छापा टाकून वाळू जप्त केली.कारवाई 30 जूनला करण्यात आली.
भोर नदी पात्रातील वाळू तस्करी रोकण्यासाठी नेमलेले पथक गस्त घालत असताना त्यांना संख मध्यम प्रकल्प व उमदी हद्दीतील भोर नदी पात्रात तस्करीसाठी साठा केलेली वाळू साठा जप्त केला. या दोन्ही कारवाईतील 10 ब्रॉस वाळूचा लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसिलदार नागेश गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी श्री.तळपे,तलाठी श्री.हिप्परकर, राहूल कोळी,नितिन कुंभार,उदगिरी,कोतवाल, पोलिस पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

संख व उमदीत तस्करीसाठी साठा पथकाने जप्त केला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here