जतेत एकाच रात्री तीन दुकानात चोरी

0
Rate Card

लाखोचा माल लंपास : शहरात चोरीचे सत्र अखंडीत सुरूच

जत,प्रतिनिधी : जत शहरातील चोऱ्यांचे सत्र बंद होण्याचे नाव घेत नसल्याचे बुधवारच्या घटनेनंतर समोर येत आहे.नित्याच्या चोरीच्या घटनेमुळे नागरिंक भयभीत झाले आहेत. मंगळवारी रात्री चोरट्यानीं पुन्हा महाराणा प्रताप चौक,राष्टीय महामार्गावरील देशी दारूचे दुकान,व लगतची दोन किराणा दुकाने फोडली.रोख रक्कम,दुकानातील माल,दारूचे बॉक्स असा सुमारे दोन लाखावर मुद्देमाल लंपास केला.मुख्य महामार्गा लगत दुकाने फोडल्याने पोलिसांच्या गस्त गाडी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शहरातील अनेक मोठी दुकाने फोडण्यावर चोरट्यानीं मोहिम उघडल्याचे चित्र आहे. मंगळवारी झालेल्या तीन चोरीच्या घटनेने जत शहरातील सुरक्षा धोक्यात आली आहे. आतापर्यत पोलिस मुख्य महामार्गावर गस्त घालतात.म्हणून शहरातील इतर भागात चोरी होत होती असे अंदाज बांधले जात होते.मात्र आतातरी महामार्गा लगतच्या दुकानात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराणा प्रताप चौकातील हणमंत बिरू सोनलकर (रा.शेगाव)यांचे देशी दारूचे दुकान चोरट्यानीं मंगळवारी रात्री फोडले.दुकाने कुलूप तोडून लाकडी दरवाज्यावर कोणत्यातरी जड वस्तूने प्रहार करून फोडून दुकानात प्रवेश केला.दुकानातील1 लाख 11 हाजार 768 रूपयाचे देशी दारूचे 44 बॉक्स चोरट्यानीं पळविले.चोरट्यानीं बिजरर्गी पेट्रोल पंपासमोरील एस.के.पटाईत यांचे किराणा दुकान फोडले.मागील बाजूचे दुकानाचे लोंखडी ग्रील कापून दुकानातील सीसीटी कँमेरा,तेलाचे बॉक्स, रोख रक्कम 15 हाजार, व अन्य किराणा साहित्य असे 60 हाजाराचा मुद्देमाल लंपास केला.पटाईत यांच्या लगत असणारे सत्तार पटाईत यांचे टोबँको सेंटर हे दुकान फोडून सिगारेट पाकिटे,सुपारी,स्टेशनरी साहित्य रोख 10 हाजार असा माल लंपास केला.शहरात चोरट्यानीं गेल्या पंधरा दिवसापासून धुमाकूळ घातला आहे.दररोज कुठेनाकुठे दुकान,घरफोडी,दुचाकी चोरी होत आहे. जत शहरात व खैराव येथे चोरट्याना नागरिकांनी पकडल्यानंतर काही काळ चोऱ्या थांबल्या होत्या.मात्र पुन्हा चोरटे सक्रीय झाले आहेत. दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटनेने दुकानदारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांना नागरिकांना चोरट्यानीं पकडून देऊनही एकाही चोरीचा अद्याप छडा लागला नाही.त्यामुळे चोऱ्यां थांबणार कशा असाही प्रश्न नित्याच्या चोरीच्या निमित्याने नागरिंक विचारत आहेत.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.