शेगाव वार्ताहर :आवंढी (ता.जत)येथील पानी फौंडेशनचे काम आदर्शवत आहे.यापुढे आंवढी पाण्याने श्रींमत होणार आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी केले.पानी फांऊडेशन आयोजित विशेष सत्कार सोहळा,व लकी ड्रा सोडत कार्यक्रमात जिल्हाधिकारी पाटील बोलत होते.आवंढीत आगमन होताच ढोल ताशांंच्या गजरात, फटाक्ययंच्या आतषबाजीत,माताभगिनींना औक्षण करुन जल्लोषात स्वागत केले.
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील म्हणाले की,जलसंधारणाचे काम तर आजवर होत आले आहे यापुढील काळातही ते होणार आहे पण आवंढीतील ग्रामस्थांनी जे मनसंधारणाचे काम करुन सर्व भेदभाव बाजुला ठेवत एकत्र येण्याचा आदर्श संपुर्ण तालुक्यालाच नव्हे तर संपुर्ण जिल्ह्याला घालुन दिला आहे,आवंढी ग्रामस्थांनी केलेले माझे स्वागत हा क्षण माझ्या आयुष्यातील अविस्ममरणय प्रसंगातील प्रसंग आहेे.असेही काळम पाटील याांनी सांगितले.त्यानंतर कार्यक्रम स्थळांकडे सर्वजण रवाना झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी ग्रामस्थांचे पानी फौंडेशनच्या केलेल्या कामाबद्दल कौतुक करुन भविष्य काळातही गावच्या सर्वांगीण विकासासाठी असेच एकत्र राहण्याचा सल्ला दिला.सरपंच आण्णासाहेब कोडग म्हणाले की यावर्षीच्या जलसंधारणाच्या कामांमुळे आवंढी गाव टँकरमुक्त होणार यात शंकाच नाही ,गावच्या विकासासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्र आलो अाहोत त्यात प्रशासनानेही आम्हास सहकार्य करावे. यावर जिल्हाधिकार्यांनी आवंढी ते सोनंद रस्ता,आवंढी ते सिंगनहळ्ळी रस्ता,नळ पाणीपुरवठा योजना व ग्रामपंचायत कार्यालय इमारत यासाठी लागणारा आवश्यक निधी प्रशासनाकडुन तात्काळ उपल्ब्ध करुन दिला जाईल याची ग्वाही दिली.कार्यक्रमात पानी फौंडेशनच्या कार्यक्रमात हिरीरीने कामकाज केलेल्या जत तालुक्यातील महसुल,पंचायत समिती,कृषी,वनविभाग, सार्वजनिक बांधकाम, पोलिस प्रशासनाच्या आधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला,तालुक्यातील पीएसआय परिक्षा उत्तीर्ण झालेल्या हणमंत मिर्जी व कु.सुरेखा शिंदे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.तालुक्यातील बागलवाडी, कुलाळवाडी व बेवनुर आदी गावांनी पानी फौंडेशनचे उत्तम काम केलेबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.ड्रँगन फ्रुट या फळ पिकाचे प्रशिक्षण परदेशात घेऊन आलेल्या संभाजी कोडग,पानी फौंडेशनचे तालुका समन्वयक तुकाराम पाटील व मुजावर मँडम,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारीका सौ.नंदा भांगरे यांची बदली झालेबद्दल सत्कार करण्यात आला.कै.कु.शुभम मधुकर कोडग यांच्या स्मरणार्थ कु.सारीका मधुकर कोडग यांचेतर्फे गुणवंत विद्यार्थांचा गौरव करण्यात आला.8 एप्रिल ते 22 मे या पानी फौंडेशनच्या कामादरम्यान दररोज श्रमदान करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी आवंढी हायस्कुलच्या 2004-2005 च्या दहावीच्या बँचच्या विद्यार्थांनी ग्रह उपयोगी वस्तुंचा लकी ड्राँ काढला होता. त्याचा बक्षिस वितरण सोहळा तसेच श्रमदानासाठी 45 दिवसात जास्तीत जास्त दिवस हजर राहणाऱ्या महिलांना, आप्पासो बाबु चव्हाण यांचेतर्फे साड्यांचे वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आवंढी ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामांबरोबरच लकी ड्राँ,साड्या वाटप,बंद पाकीटांचा लकी ड्राँ,महिलांसाठी नाकातील खडे वाटप,पुरुषांसाठी ड्रेस,45 दिवस श्रमकऱ्यांना नाष्ट्याची सोय,कामावरती येण्या-जाण्यासाठी लागणारी वहाने,ट्रँक्टर व बैलजोड्या स्वखुशीने दिल्या याबाबत कौतुक केले.प्रास्ताविक आयुक्त कार्यालय पुणे येथील चिटणीस दगडु कुंभार यांनी,सुत्रसंचालन चंद्रकांत कोडक,आभार उपसरपंच डॉ.प्रदिप कोडग यांनी मानले.यावेळी उपजिल्हाधिकारी नाटेकर,तहसिलदार अभिजित पाटील यांच्या सौभाग्यवती त्रप्ती पाटील,सर्वच विभागाचे आधिकारी,आवंढी गावातील महिला,पुरुष,आवंढीची पानी फौंडेशन टीम व युवक वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आंवढीताल पानी फांऊडेशन आयोजित विशेष सत्कार कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील,प्रांरभी जिल्हाधिकारी काळम-पाटील यांचे महिलांनी औक्षण केले.






